Home » राज्य » GONDIA | गोंदियाच्या खमारी येथे घरगूती गॅसचा सिलेंडरचा स्फोट

GONDIA | गोंदियाच्या खमारी येथे घरगूती गॅसचा सिलेंडरचा स्फोट

गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. या आगीमध्ये जीवनापयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उके यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरच्या स्फोट झाला. स्पोट इतका भीषण होता की यामुळे संपूर्ण घराला आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, जवळपास 3 लाख रुपयांचे जीवनपयोगी साहित्याचे यात नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आटोक्यात आणली.

 

https://www.youtube.com/watch?v=TR7gRz-097s&ab_channel=PanchtantraOne

Leave a Comment