Home » राज्य » DHULE | बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केला उध्वस्त

DHULE | बनावट दारूचा कारखाना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने केला उध्वस्त

धुळे शहरातील 100 फुटी रोड जामचा मळा परिसरात असलेल्या सुमैया हॉलच्या पाठीमागे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सादर बनावट दारूचा कारखाना उध्वस्त केला असून तब्बल 7 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी हस्तगत केला आहे.धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या जामचा मळा भागातील सुमैया हॉलच्या पाठीमागे अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली होती. या ठिकाणी तयार होत असलेली देशी दारू गुजरातसह अन्य ठिकाणी देखील विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने छापा टाकून कारवाई केली असून हा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

शेख जावेद शेख मोहम्मद नामक व्यक्ती हा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 7 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत बनावट दारू देखील मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली असून दारू तयार करण्याचे साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?