नुकत्याच साऊथ एशिया अॅथलेटीक्स ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा कर्नाटक मध्ये पार पडल्या. या स्पर्धेमध्ये दक्षिण आशिया खंडातील भारत, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, मालदीव, भुतान ह्या देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये 5 हजार मीटर धावणे मध्ये क्रिडा प्रकारात बुलढाण्याच्या विकास तिडके यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांच्या या यशामुळे भारताचे नाव उंचावलं आहे. तसेच 1500 मीटर धावणे मध्ये सुद्धा त्यांनी तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक प्राप्त केले आहे.




Users Today : 24