Home » राज्य » त्र्यंबकेश्वर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

त्र्यंबकेश्वर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

त्र्यंबकेश्वर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सपत्नीक त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. यावेळी विधिवत पौराहित्य करुन पूजा केली. यावेळी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, माणिकराव कोकाटे, आ.हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.

गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.

नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत [हेमाडपंती स्थापत्यशैली]त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

 

“गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ  आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.

दि २४ जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले. त्यानंतर शहा यांनी सपत्नीक संकल्प पूजा केली. पौरोहित्य मनोज थेटे यांच्यासह लक्ष्मीकांत थेटे यांनी केले. यावेळी मंत्रोपचाराने परिसरात धार्मिक वातावरण होते. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन नितीन जेवले, विश्वस्त कैलाश घुले, रुपाली भुतडा, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्नील शेलार, प्रदीप तुंगार, श्रेया देवचक्के आदी उपस्थित होते.

 

त्र्यंबकेश्वर : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

दरम्यान अमित शहा यांना देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?