Home » राज्य » KALYAN | कल्याणमधील प्रवाशांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघातातील थरारक अनुभव

KALYAN | कल्याणमधील प्रवाशांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघातातील थरारक अनुभव

जळगाव मध्ये झालेली दुर्घटनाग्रस्त पुष्पक एकाप्रेस रात्री साडे अकरा वाजता कल्याण स्थानकात पोहोचली. या ट्रेन मधून प्रवास करणारे प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी कल्याण स्थानकात दाखल झाले होते. आपल्या नातेवाईकाला सुखरूप बघून त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान या एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या संदीप जाधव या प्रवाशाने घडलेली घटना कथन करताना चालत्या एक्सप्रेस मधून प्रवाशांनी मारलेल्या उड्या आणि समोरून आलेल्या एक्सप्रेस खाली चिरडले गेलेले प्रवासी यांचे केलेले वर्णन अंगावर काटा आणणारे होते.पुष्पक एक्सप्रेस दीड तास उशिराने धावत होती त्यामुळे या गाडीचा वेग थोडा जास्त होता यामुळे चाक आणि रुळाचे घर्षण होत आगीच्या ठिणग्या उडत होत्या मात्र यामुळेच काही प्रवाशांनी गाडीला आग लागल्याचा समज करून घेत चालत्या गाडीतून उड्या मारल्या आणि अपघात झाला. जळगाव स्थानकापासून काही अंतरावर गाडी थांबली होती याची माहिती मिळताच संदीप जाधव आणि त्यांच्या मित्रांनी ट्रेनमधून उतरून दुर्घटनाग्रस्त बोगीच्या जवळ जात शक्य तितक्या जखमींना रुग्णालयात धाडण्यासाठी मदत केल्याचे सांगितले. जखमीं बरोबर मयत प्रवाशांचे मृतदेह रुग्णालयात पाठवल्या नंतर ही एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने रवाना झाली. रात्री आडे अकरा वाजता ही एक्सप्रेस कल्याण मध्ये पोहोचली.

Leave a Comment