Home » शिक्षण » KALYAN | कल्याण पूर्वेत रेल्वेच्या जागेवर असणाऱ्या शाळेला रेल्वेने पाठवली नोटीस, 28 तारखेला होणार कारवाई

KALYAN | कल्याण पूर्वेत रेल्वेच्या जागेवर असणाऱ्या शाळेला रेल्वेने पाठवली नोटीस, 28 तारखेला होणार कारवाई

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरील रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली आहे. 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेने शाळा प्रशासनाला दिले आहेत. रेल्वेच्या या निर्णयाला शाळेतील शिक्षक पालकांसह विद्यार्थ्यांनी देखील विरोध केला आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून ही शाळा या ठिकाणी सुरू आहे, 400 हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत, दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत, प्रिलीम्स सुरू आहेत त्यातच रेल्वेने ही कारवाई केली तर 400 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय? असा सवाल केला आहे, या कारवाई विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली आहे, रेल्वेने आम्हाला मुदत द्यावी अशी मागणी शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी केली आहे.

Leave a Comment