Home » Today In Focus » CHH.SAMBHAJINAGAR | विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवत क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणुकदारांची 35 कोटींची फसवणूक

CHH.SAMBHAJINAGAR | विदेशवारी, जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवत क्विक स्टार्ट कंपनीकडून गुंतवणुकदारांची 35 कोटींची फसवणूक

राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर 3 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये घेत कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या कंपनीने एक लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल.

त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांना 35 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचे नोटरी रजिस्ट्री हे गुजरात मध्ये केले गेले. शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?