Home » Today In Focus » CHH.SAMBHAJINAGAR | अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

CHH.SAMBHAJINAGAR | अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपघातातील मृत महिलेच्या अंगावरील पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक .गंगापूर पोलिसांनी दोन तासातच चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करत मुद्देमाल जप्त केला आहे .आकाश साळवे असे चोरी करणारे आरोपीचे नाव आहे .15 जानेवारीला रात्री 11:30 वाजता शिलेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.- दवाखान्यात आणले तेव्हा मयतांच्या गळ्यामध्ये दागिने होते मात्र नंतर ते दागिने दिसून आलेले नाहीत. काल एका मृत महिलेच्या नातेवाईकाने पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दागिने कोणीतरी काढून घेतले आहेत .चोरीचा गुन्हा दाखल करुन सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांना तपासासाठी बोलवण्यात आले. चौकशी करत असताना असे लक्षात आले की गंगापूरला राहणाऱ्या आकाश साळवेने ही चोरी केली आहे .आरोपी आकाश साळवे कडून चोरी गेलेले दोन लाख 80 हजारांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत . चोरी करणारा आरोपी या अगोदर रुग्णवाहिनीवर चालकाचे काम करत होता .दागिने बघून त्याने लालसेपोटी चोरी केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे

Leave a Comment