Home » Uncategorized » JALNA | जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या चोरीच्या प्रयत्नात चार लाखांचे नुकसान; जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ.एस.जी.गवारेंची माहिती

JALNA | जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या चोरीच्या प्रयत्नात चार लाखांचे नुकसान; जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ.एस.जी.गवारेंची माहिती

जालन्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील सोलार वॉटर हीटरचे 26 ट्यूब लाईट फोडून चोरी करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला कदीम पोलिसांनी जेरबंद केलं आहे तर दुसरा आरोपी फरार आहे.14 जानेवारी रोजी रात्री साडे नऊ वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारे सोलार वॉटर हीटर ट्यूब लाईट आणि साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या वॉटर हीटरच्या पाईप मध्ये तांबा हा धातू असून या तांब्याची चोरी करण्यासाठी 2 अज्ञात चोरटे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर गेले होते. त्या दरम्यान दोन चोरट्यांनी सोलार वॉटर हीटरचे 26 ट्यूब लाईट फोडले. साहित्य चोरण्याचा प्रयत्नात असणाऱ्या याद दोघांना गस्तीवर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने पाहिले. त्याच वेळी सुरक्षा रक्षक आणि चोरट्यामध्ये झटापट झाली.

 

सुरक्षारक्षकाने एका चोरट्यास पकडले तर दुसरा चोराने धूम ठोकली. तात्काळ सुरक्षा रक्षकाने हा सर्व प्रकार प्रशासनाला सांगितला त्यानंतर त्यांनी 112 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच कदिम जालना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सुरक्षारक्षकाने पकडलेल्या एका चोरट्याला कदीम जालना पोलिसांच्या ताब्यात दिले. कदिम जालना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या चोरी प्रकरणी अंदाजे चार लाखाचं नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉ एस. जी. गवारे यांनी दिली आहे.

Leave a Comment

Will the middle class get relief from the first general budget of Modi 3.0?