अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातुन व मध्य प्रदेशातून रुग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात. 400 बीडची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात अनेकदा 500 -600 च्या वर रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर दोन तर कधी खाली जमिनीवर झोपवुन उपचार केला जातो. कोरोना काळात बेडची कमतरता पडू नये यासाठी सुप्पर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मागे 100 बेड प्रि फॅब रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली.
मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे प्रि फॅब रुग्णालय आता भंगार साहित्य ठेवण्याचे ठिकाण झाले असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहे. तीन कोटी रुपये खर्च करून सीएसआर फंडातून रुग्णालय उभारण्यात आलं मात्र शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून देखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्याने हे रुग्णालय धूळखात पडल्याची कबुली जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली, त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हॉस्पिटल आता शोभेची वस्तू बनली आहे.




Users Today : 3