Home » राजकारण » अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य

अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य

अमित शाह हे शिंदे गटाच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शाह आणि मोदीच राज्यातील तिन्ही पक्ष चालवतात, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला होता. राऊत यांच्या या हल्ल्याचा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. होय, अमित शाह आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तुम्हाला काय करायचे आहे? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

होय. अमित शहा आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. पण त्याचा तुम्हाला त्रास काय होत आहे? नालायक हो, तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधी यांची गळाभेट करत होता तेव्हा काय झालं? आम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना मानतो. त्यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.

Leave a Comment

hacklink jojobetjojomeritkingmeritking girişhacklink panel