Home » ताज्या बातम्या » या घडीची आनंदाची बातमी :

या घडीची आनंदाची बातमी :

मे महिन्याचा पहिला दिवस ग्राहकांसाठी दिलासा घेऊन आला आहे.  उन्हाच्या झळांनी सध्या नागरिक त्रस्त आहेत. त्यातच ही आनंदवार्ता येऊन धडकली.  गॅस सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात किंमती भडकल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती गेल्या दहा वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. ती खरी नागरिकांची चिंता आहे. यापूर्वी गॅस दर इतके कधीच भडकले नव्हते. या महिन्याच्या सुरुवातीलाच किंमती घसरल्याने ग्राहकांना आता हॉटेलिंगचा आनंद घेता येईल.

या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत (19 किलो) घसरण झाली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत (14.2 किलो) कोणताही बदल झाला नाही. गेल्या वेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तात्काळ प्रभावाने वधारल्या होत्या. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत ही सातत्याने बदल होत आहे. तर अनेक दिवसांपासून घरगुती गॅसच्या किंमती अटोक्यात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमत जैसे थे आहेत. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाले आहे.

ताज्या अपडेटनुसार, दिल्लीत आतापर्यंत 19 किलोच्या गॅससाठी ग्राहकांना 1747.50 रुपये द्यावे लागतील. एप्रिल महिन्यात हेच सिलेंडर 1762 रुपयांना मिळत होते. तर मार्च महिन्यात एका गॅस सिलेंडरसाठी 1803 रुपये मोजावे लागत होते. म्हणजे गेल्या एका महिन्यात 14.5 रुपये आणि दोन महिन्यात एकूण 55.5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना या कपातीचा मोठा फायदा झाला आहे. त्यांचा खर्च कमी झाला आहे.

कोणत्या शहरात आता काय भाव

दिल्ली : 1,747.50 रुपये (एप्रिल महिन्यात 1,762 रुपये)

कोलकाता : 1,851.50 (1,868.50 रुपये)

मुंबई : 1,699 रुपये ( एप्रिल 1,713.50 रुपये)

चेन्नई : 1,906.50 रुपये ( एप्रिल 1,921.50 रुपये)

सलग दुसर्‍यांदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. 1 एप्रिल रोजी दिल्लीत सिलेंडरची किंमत 41 रुपयांनी स्वस्त झाली. तर आता किंमतीत 14.50 रुपयांची कपात झाली आहे.

या सगळ्यात मात्र घरगुती सिलेंडरचे दर हे जैसे थे च आहेत.

Leave a Comment

hacklink jojobetjojomeritkingmeritking girişhacklink panel